- भाजपा युवा मोर्चाचे महापौर रवि लांडगे यांना निवेदन…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिचंवड (दि.१० मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील शालेय विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी आंतरशालेय महापौर चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा पुन्हा सुरू करण्याची मागणी भाजपा युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने करण्यात आली. याबाबत महापौर रवि लांडगे, क्रीडा सभापती कैलास कुटे आणि अतिरिक्त आयुक्त यांना भेटून लेखी निवेदन देण्यात आले.
निवेदनात शहरातील खेळाडूंसाठी असलेले धोरण, क्रीडा स्पर्धा व क्रीडा साहित्य या विषयांवर चर्चा करण्यात आली. सन २०१९ मध्ये शेवटची झालेली आंतरशालेय महापौर चषक टी-२० स्पर्धा पुन्हा सुरू करून महानगरपालिका व खासगी शाळांतील विद्यार्थ्यांना सहभागाची संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच स्पर्धेसाठी दर्जेदार मैदाने, पिण्याचे पाणी, आवश्यक सुविधा, क्रीडा शिष्यवृत्ती तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना प्रोत्साहनपर मानधन देण्याची मागणीही करण्यात आली.
या वेळी भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष दिनेश यादव, प्रदेश सचिव अजित कुलथे, प्रसाद कस्पटे, दिनेश काटे, राहुल खाडे, साची दोशी, राजेश डोंगरे, मनोज घोडेकर, अजय भोंडवे, जालिंदर काटे, मयूर काळभोर, गौरव शिरुडे, हेमंत देवकुळे, शरद भालेकर, आशिष राऊत, कृष्णा कदम, अभिजीत बागुल, अजय मोरे, सचिन उदागे, नितीन साळी, राजेश चौधरी, प्रतीक रामगुडे, ऋषिकेश भालेकर, प्रदीप पवार, शंतनु चौधरी, साईराज भालेकर, ओंकार पवार आणि प्रतिक तळेकर उपस्थित होते.












