- नेमके प्रकरण काय? नागरिकांमध्ये कुजबुज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ११ मार्च २०२६) :- दापोडी परिसरात एका वाहनावर “POLICE” तसेच “पुणे महानगरपालिका” अशी दोन्ही नावे लिहिलेली आढळल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सामान्यतः पोलिस विभागाच्या वाहनांवर केवळ पोलिस विभागाचा उल्लेख असतो. मात्र या वाहनावर महानगरपालिकेचेही नाव असल्याने हे वाहन नेमके कोणत्या विभागाच्या वापरात आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणाबाबत पोलिस विभाग, महानगरपालिका प्रशासन तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) यांच्याकडून अधिकृत स्पष्टीकरण मागण्याची गरज असून, संबंधित वाहनाची नोंदणी व वापर याबाबत माहिती समोर येण्याची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, अशा प्रकारच्या वाहनांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, त्यामुळे प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.












