- लेबर कॅम्पमध्ये कामगाराचा निर्घुण खून..
- हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट; पोलिस तपास सुरु…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ११ मार्च २०२६) :- एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांधकाम साईटवरील लेबर कॅम्पमध्ये एका कामगाराचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकेश्वर स्पर्श बांधकाम प्रोजेक्ट, कुदळे वस्ती येथे ९ मार्च रोजी रात्री ९ ते ११.३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. सी बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरील लेबर कॅम्पमध्ये राहणारा बालाजी मारोती रेड्डी खंदाडे (वय २९, मूळ रा. हंगरगा, ता. मुखेड, जि. नांदेड) हा बांधकाम साईटवर स्टील फिटर म्हणून काम करत होता.
याच ठिकाणी काम करणारा व मयताचा नातेवाईक असलेला प्रदीप विठ्ठल गुंडरे (वय ३१, रा. सध्या मोशी) याने कोणत्यातरी कारणावरून सिलेंडरच्या टाकीने मारहाण करून बालाजी खंदाडे याला गंभीर जखमी केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी अनिकेत विनायक भुरे (वय २१) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि पाटील करीत आहेत.












