- आठ प्रभागांसाठी समन्वय अधिकारी नियुक्त…
- नागरिकांच्या तक्रारींवर प्रभाग स्तरावर तात्काळ कार्यवाही…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.११ मार्च २०२६) :- पिंपरी चिंचवड शहरातील पशुवैद्यकीय विभागाशी संबंधित तक्रारींचे जलद आणि प्रभावी निवारण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आठ प्रभागांसाठी स्वतंत्र समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
शहरातील भटक्या श्वानांच्या प्रश्नावर सर्वसाधारण सभेत झालेल्या चर्चेनंतर आणि महापौर रवि लांडगे यांच्या निर्देशानुसार ही नवीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यापूर्वी तक्रारींचे निवारण मुख्यालय स्तरावरून होत असल्याने कार्यवाहीस वेळ लागत होता. मात्र आता प्रत्येक प्रभागात समन्वय अधिकारी नियुक्त केल्याने नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही होणार आहे.
या यंत्रणेद्वारे श्वानांवर उपचार, नसबंदी, तसेच आक्रमक श्वानांना निरीक्षणाखाली ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे तक्रार निवारण प्रक्रियेत वेग आणि पारदर्शकता येईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. नागरिकांना सेवा अधिक सुलभ व जलद मिळाव्यात हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी सांगितले.
समन्वय अधिकारी व संपर्क क्रमांक :-
मदनुरकर इरण्णा – अ प्रभाग – ९१३०५८०७५१
शरद राठोड – ब प्रभाग – ७७७६८१२०९०
राहुल गुलाले – क प्रभाग – ७९७२६०९२७८
निरज हटवार – ड प्रभाग – ७०२०३१४९४३
समीक्षा कुंभार – इ प्रभाग – ९४२१६३२५३८
सुरज शिंदे – फ प्रभाग – ९३७०४४३८१५
निशिगंधा कचवे – ग प्रभाग – ९२८४८०११७७
सुनील कांबळे – ह प्रभाग – ८८८८४४२०४६












