- पाणीपुरवठा, स्वच्छता, अतिक्रमण आणि पर्यावरण उपक्रमांवर भर….
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.११ मार्च २०२६) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयात महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी पाणीपुरवठा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, अतिक्रमण हटविणे आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर देण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.
प्रत्येक प्रभागात नागरिकांना योग्य दाबाने स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी असल्याचे सांगत पाणीपुरवठा यंत्रणेची नियमित तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच शहरातील कचरा साचणाऱ्या ठिकाणांचे सुशोभीकरण करून पुढील तीन महिन्यांत कचरा ठिकाणे हटविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.
सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, अतिक्रमण हटविणे, वृक्षलागवड वाढविणे तसेच हॉकर्स झोनचे नियोजनबद्ध नियोजन करण्याबाबतही चर्चा झाली.
बैठकीस विविध नगरसदस्य, उपआयुक्त प्रदीप ठेंगल, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.












