- नागरिकांना सुरक्षित व पर्यावरणपूरक गॅस सुविधा देण्यासाठी बैठकीत चर्चा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.१६ मार्च २०२६) :- शहरातील नागरिकांना सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि सुलभ नैसर्गिक गॅस सेवा उपलब्ध व्हावी तसेच विकासकामांमध्ये कोणताही विलंब होऊ नये, यासाठी महानगरपालिका आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) यांनी समन्वयातून काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.
पिंपरी चिंचवड शहरात नैसर्गिक वायू वितरणाशी संबंधित कामे अधिक वेगाने व प्रभावीपणे राबविण्याच्या अनुषंगाने एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांसोबत महापौर रवि लांडगे यांची बैठक झाली. या बैठकीत शहरातील विविध प्रकल्पांबाबत चर्चा करण्यात आली.
बैठकीला महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे, एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक कुमार शंकर, व्यवसायिक संचालक शंकर करजगी व भाग्यश्री मंथलकर उपस्थित होते.
बैठकीनंतर महापौरांनी एमएनजीएलच्या शिष्टमंडळासह आयुक्तांची भेट घेतली. यावेळी एमएनजीएलच्या कामांसाठी आवश्यक परवानग्या तातडीने देण्याबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या.
















