- प्रस्तावित क्षेत्रीय कार्यालयं आणि अशी असतील त्यांची नावे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २० मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्यमान ८ प्रभाग समित्यांची पुनर्रचना करून त्याऐवजी १० प्रभाग समित्या (क्षेत्रीय कार्यालये) स्थापन करण्यासह त्यांच्या नामांतरणाचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत शुक्रवारी (दि. १३) उपसूचनेनुसार महापौरांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.
त्याला सूचक म्हणून नगरसेवक विनोद नढे तर अनुमोदक म्हणून गायकवाड आहेत.
नागरिकांना अधिक कार्यक्षम व तत्पर सेवा देण्यासाठी तसेच वाढत्या लोकसंख्या आणि भौगोलिक विस्ताराचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे म्हणणे आहे तर, वाढीव क्षेत्रीय कार्यालयांना राष्ट्रवादीचा विरोध आहे. त्यामुळे महासभेत या प्रस्तावाला मंजुरी मिळते की प्रस्ताव बारगळतो हे पाहणे रंजक ठरेल.
प्रस्तावित क्षेत्रीय कार्यालय आणि अशी असतील त्यांची नावे…
- अ क्षेत्रीय कार्यालय :- राजगड
- ब क्षेत्रीय कार्यालय :- सिंहगड
- क क्षेत्रीय कार्यालय :- विजयदुर्ग
- ड क्षेत्रीय कार्यालय :- देवगिरी
- ई क्षेत्रीय कार्यालय :- शिवनेरी
- फ क्षेत्रीय कार्यालय :- तोरणा
- ग क्षेत्रीय कार्यालय :- पुरंदर
- ह क्षेत्रीय कार्यालय :- प्रतापगड
- ज क्षेत्रीय कार्यालय :- रायगड
- ल क्षेत्रीय कार्यालय :- लोहगड








