- पिंपरी-चिंचवड आरटीओचे वाहन मालकांना आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २० मार्च २०२६) :- प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड (संत नगर, मोशी) यांनी पोस्टाद्वारे न पोचलेल्या वाहन नोंदणी प्रमाणपत्रांबाबत (RC) महत्त्वाचे आवाहन केले आहे. सन २०११ ते २०१७ या कालावधीत पोस्टातून परत आलेली अनेक आरसी कार्यालयात प्रलंबित आहेत. विविध कारणांमुळे वाहन मालकांपर्यंत न पोचलेल्या या आरसी संबंधितांनी अद्याप प्राप्त करून घेतलेल्या नाहीत.
आरटीओ प्रशासनाने स्पष्ट केले की, अशा आरसी मोठ्या प्रमाणात जागा व्यापत असून नव्या परत येणाऱ्या प्रमाणपत्रांसाठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे संबंधित वाहन मालकांनी ३० एप्रिल २०२६ पूर्वी आवश्यक कागदपत्रांसह खिडकी क्रमांक ३ येथे संपर्क साधून आपली आरसी घ्यावी.
निर्धारित मुदतीनंतर न घेतलेल्या आरसींचे निर्लेखन करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.








