न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (21 मार्च 2026) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आरोग्य विभागाने प्लास्टिक वापर व अस्वच्छतेविरोधात धडक कारवाई करत ३१ हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच सुमारे ८ किलो प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले.
इंद्रायणी नगर (प्रभाग ०८) येथे प्लास्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करत १८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तर नेहरू नगर (प्रभाग ०९) येथे १३ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
नागरिकांनी कचरा व्यवस्थापन नियमांचे पालन करून प्लास्टिकचा वापर टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.














