न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३१ मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवडमधील ‘कलारंग’ सांस्कृतिक संस्थेतर्फे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी ३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात होणार आहे.
या सोहळ्याला पद्मश्री गिरीश प्रभुणे प्रमुख उपस्थिती म्हणून लाभणार असून त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी अध्यक्ष योगेश सोमण, कार्यवाह स्वाती महाळंक व कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांच्यासह नव्या कार्यकारिणीचा गौरव होणार आहे.
आ. अमित गोरखे यांनी साहित्य व संस्कृती जपण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे सांगत नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.














