न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३१ मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहराच्या जागतिक ओळखीबाबत केलेल्या वक्तव्यावरून आ. शंकर जगताप यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हे विधान बेजबाबदार असून शहराच्या अस्मितेचा अपमान करणारे असल्याचे त्यांनी म्हटले.
संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या पावन भूमीला तसेच चापेकर बंधूंच्या बलिदानाला कमी लेखणे अयोग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत असताना पिंपरी-चिंचवडने औद्योगिक शहर म्हणून मोठे योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे शहराला आयटी हब व स्मार्ट सिटीची ओळख मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शहराच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला देत अस्मितेला धक्का सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.














