- आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३१ मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पावसाळ्यापूर्वी सर्व नालेसफाईची कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच नाल्यांवरील अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले. शहरात पाणी साचू नये यासाठी यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात आला.
बैठकीत स्वच्छ सर्वेक्षण २०२६ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. शहरातील १४५ नाले व सुमारे ९४ हजार मीटर लांबीच्या नाल्यांची सफाई सुरू असून प्रगती २२.६७ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
‘फ’ क्षेत्रीय कार्यालय आघाडीवर असून इतर विभागांनीही चांगली कामगिरी केली आहे. कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी, जनजागृती मोहीम व ‘माझी वसुंधरा’ अभियानावरही भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या.














