- मा. आमदार विलास लांडे यांचा महापालिका आयुक्तांना सल्ला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३१ मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाचा समृद्ध वारसा जपण्याची गरज असल्याचे मत माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केले. त्यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व प्रशासनाने वादग्रस्त वक्तव्यांपासून दूर राहून विकासकामांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन केले.
पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक व कामगार नगरी असून टाटा, बजाज, फोर्स यांसारख्या उद्योगांमुळे शहराला वेगळी ओळख मिळाल्याचे त्यांनी सांगितले. विविध राज्यांतून आलेल्या कामगारांनी शहराच्या प्रगतीत मोठा वाटा उचलल्याचे त्यांनी नमूद केले.
शहराच्या जडणघडणीत शरद पवार, अजित पवार, रामकृष्ण मोरे आदींचे योगदानही त्यांनी अधोरेखित केले. माजी आयुक्तांच्या कार्याचा उल्लेख करत विद्यमान प्रशासनानेही त्याच धर्तीवर काम करावे, असे सांगत शहराच्या विकासासाठी राजकारण टाळण्याचे आवाहन त्यांनी केले.














