न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३१ मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयातर्फे दापोडी येथील आनंदवन झिरो वेस्ट प्रकल्पात आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर तसेच आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविण्यात आले. पथनाट्य हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले असून त्यातून कचरा विलगीकरण, सिंगल यूज प्लास्टिक बंदी, कापडी पिशव्यांचा वापर आणि घरगुती कंपोस्टिंग याबाबत जनजागृती करण्यात आली.
तसेच ‘आर.आर.आर. सेंटर’ संकल्पनेची माहिती देण्यात आली. उपस्थितांना झिरो वेस्ट प्रकल्पाची पाहणी करून आधुनिक कचरा व्यवस्थापनाच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमास महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.














