- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महावितरणला दिला वीजपुरवठा खंडित करण्याचा आदेश…
- ‘आप’च्या रविराज काळेंची माहिती…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे निलख (दि.०१ एप्रिल २०२६) :- पिंपळे निलख परिसरात CNG पंपच्या मागे सुरू असलेल्या ग्रेस्टोन इन्फ्रा व कार्निवल इन्फ्रा या दोन अनधिकृत RMC प्लॅन्टमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर हवा प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. या प्लॅन्टमधून निघणाऱ्या धुरामुळे व धुळीमुळे परिसरातील रस्ते व वातावरण प्रदूषित झाले आहे.
या भागात शाळा, खेळाचे मैदान, गार्डन तसेच अनेक सोसायट्या असल्याने लहान मुले, खेळाडू व ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर येथे येत असतात. त्यामुळे श्वसनासंबंधित आजार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाने यापूर्वी प्लान्ट सील केला होता, मात्र संबंधितांनी तो तोडून पुन्हा सुरू केल्याचा आरोप आहे. तरीही प्रशासनाने कारवाई न केल्याने संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महावितरणला वीजपुरवठा खंडित करण्याबाबत पत्र दिल्याची माहिती आपचे रविराज काळे यांनी
निवेदनाद्वारे प्रसिध्दीस दिली आहे.















