न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०२ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी झालेल्या बैठकीत प्रभाग क्रमांक ८ मधील एमआयडीसीतील एस आणि जे ब्लॉकसह इतर आणि सेक्टर नंबर ९,११,१२,१३ या ठिकाणच्या परिसरातील तब्बल दीड कोटींपेक्षा अधिकच्या रस्ते डांबरीकरणाच्या कामांना मंजुरी दिली.
महापालिकेच्या स्थापत्य विभागाने काढलेल्या निविदांमध्ये Pandurang Enterprises या एकाच ठेकेदाराने तब्बल ३८ ते ३९ टक्के कमी दरात ही कामे स्वीकारली आहेत. त्यामुळे या कामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत असून बाब चिंतेचा विषय ठरत आहे.
एमआयडीसी परिसरातील विविध रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ठेकेदारास काम देण्यात आले आहे. इतक्या कमी दरात काम करताना दर्जेदार साहित्य व योग्य तांत्रिक मानके पाळणे कठीण होऊ शकते. महापालिका प्रशासनाने खर्च वाचविण्याच्या उद्देशाने ही पावले उचलली असली, तरी यामुळे भविष्यात रस्त्यांची निकृष्ट कामे, वारंवार दुरुस्ती आणि अतिरिक्त खर्च वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.














