न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०३ एप्रिल २०२६) :- निगडी प्राधिकरण सेक्टर २६ येथे नागरिक आणि महापालिकेच्या संयुक्त सहभागातून उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
यावेळी बोलताना त्यांनी, लोकसहभागातून उभे राहणारे उपक्रम हीच शहर विकासाची खरी ताकद असल्याचे सांगितले. पर्यावरण संवर्धन ही सामूहिक जबाबदारी असून अशा प्रकल्पांमुळे शहर अधिक आरोग्यदायी होईल, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास अमित गोरखे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी वृक्षारोपण करून ‘माझी वसुंधरा’ शपथ घेण्यात आली. शहरातील २०३ उद्यानांपैकी २५ ते ३० उद्यानांमध्ये अशा संकल्पना राबवण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. लोकसहभागातून साकारलेले हे ऑक्सिजन पार्क पर्यावरण संतुलन राखण्यास आणि हरित शहराच्या संकल्पनेला बळ देणारे ठरणार आहे.










