- दरमहा हप्त्याने परतफेड; आयुक्तांचा आदेश जारी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०४ एप्रिल २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपयांचा सण अग्रिम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला.
सहाव्या वेतन आयोगानुसार ग्रेड पे ४८०० पेक्षा कमी किंवा सातव्या वेतन आयोगातील एस-१७ पे लेव्हलखालील पात्र कर्मचाऱ्यांना ऐच्छिक स्वरूपात हा लाभ मिळणार आहे. ही रक्कम मे २०२६ पासून दरमहा १५०० रुपयांच्या १० हप्त्यांत परतफेड करावी लागणार आहे.
महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. तर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा सन्मान असल्याचे नमूद केले.














