- दिनेश यादव यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०४ एप्रिल २०२६) :- पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शहराध्यक्ष दिनेश लालचंद यादव यांच्या संकल्पनेतून पदाधिकाऱ्यांना अधिकृत ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे संघटनात्मक शिस्त, पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमात विविध प्रभागांतील पदाधिकाऱ्यांना नाव, पद व संपर्क माहिती असलेली ओळखपत्रे देण्यात आली. त्यामुळे नागरिकांशी संवाद साधताना अधिकृत ओळख मिळणार आहे. “ओळखपत्र ही जबाबदारी आणि शिस्त अधोरेखित करणारे साधन आहे,” असे दिनेश यादव यांनी सांगितले.
यावेळी सरचिटणीस मधुकर बच्चे, प्रदेश सचिव अजित कुलथे, सरचिटणीस दिनेश काटे, प्रसाद कस्पटे, साची दोषी, सन्मक साबळे, राहुल खाडे, सुमित घाटे, गणेश सस्ते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या उपक्रमामुळे युवा मोर्चाचे कार्य अधिक सक्षम व प्रभावी होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.














