न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ०५ एप्रिल २०२६) :-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)कडून ‘माण–हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग-३’ प्रकल्पांतर्गत पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत ५,५०० नव्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
या सर्व झाडांचे जगण्याचे प्रमाण १०० टक्के असल्याची माहिती समोर आली आहे. प्रकल्पासाठी बाधित झालेल्या १,३०५ झाडांपैकी ५५७ झाडे तोडण्यात आली, तर ७४८ झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले. पुनर्रोपित झाडांपैकी ८० टक्के झाडे यशस्वीरीत्या जगली असून त्यांना फळे-फुले येऊ लागली आहेत.
ही झाडे शहरातील विविध भागांत लावण्यात आली असून, प्रत्येक झाडाचे जिओटॅगिंग करून त्यावर क्यूआर कोड लावण्यात आला आहे. स्कॅन केल्यावर झाडाची माहिती उपलब्ध होते. या उपक्रमामुळे विकास आणि पर्यावरणाचा समतोल साधला जात असल्याचे पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.










