- AI-आधारित CCTV, ट्रॅफिक व्यवस्थापन व सुशोभीकरणावर भर…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
लोणावळा (दि. ०६ एप्रिल २०२६) :- लोणावळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत शहराला स्मार्ट सिटीच्या धर्तीवर विकसित करण्यासाठी विविध योजनांवर चर्चा करण्यात आली.
शहरातील प्रमुख रस्त्यांचे सुशोभीकरण, ट्रॅफिक व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, फूटपाथ सुधारणा, भूमिगत वीजवाहिन्या, पथदिवे, पार्किंग झोन, पाणीपुरवठा नियोजन व अतिक्रमण नियंत्रण यांसारख्या मुद्द्यांवर सविस्तर आराखडा मांडण्यात आला. विशेषतः AI तंत्रज्ञानावर आधारित CCTV प्रणालीद्वारे वाहतूक व सुरक्षा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीत सुनील शेळके यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. शहराच्या विकासासाठी त्यांची दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा अधोरेखित झाला.
तसेच २०२७ मध्ये होणाऱ्या “Pune Grand Tour Cycle Race” स्पर्धेमुळे लोणावळ्याच्या पर्यटन व अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. बैठकीस नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते.










