न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १५ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड येथील ज्येष्ठ समाजसेवी अशोककुमार पगारिया यांची सकल स्थानकवासी जैन श्रावक संघ, पुणे जिल्हा या संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. समाजकारण, शैक्षणिक व सामाजिक संस्थांमधील त्यांच्या प्रदीर्घ योगदानामुळे ही निवड महत्त्वाची मानली जात आहे.
पगारिया हे ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या जैन भवन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष असून पिंपरी-चिंचवड जैन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच भगवान महावीर एज्युकेशन सोसायटी, पार्श्वनाथ क्रीडा मंडळ, आनंद परिवार ट्रस्ट, महर्षी आनंद सेवा प्रतिष्ठान, ओम जय आनंद डायलिसिस सेंटर, माजी विद्यार्थी संघ, शिवाजी विद्यालय धामणी, रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स पुणे शाखा, पश्चिम भारत सीए स्टुडंट विकासा आणि लक्ष्मी बँक यांसारख्या अनेक संस्थांमध्ये त्यांनी संस्थापक किंवा अध्यक्ष म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
याशिवाय आनंद तीर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मै भारत हुं फाउंडेशन, प्रीतम मेडिकल फाउंडेशन आणि जितो चिंचवड-पिंपरी अशा विविध संस्थांमध्येही ते पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
सकल जैन स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजयकांत कोठारी, निवर्तमान अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, विद्यमान अध्यक्ष विलास राठोड आणि वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केली आहे.
गेल्या ४० वर्षांहून अधिक काळाच्या समाजसेवेतील अनुभवाचा संघाला निश्चितच मार्गदर्शन मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक संस्थांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.














