- पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अभिवादन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १५ एप्रिल २०२६) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समता, स्वातंत्र्य आणि न्यायाचा विचार हा संविधानाचा पाया असून आजच्या पिढीने त्यांच्या विचारांना आचरणात आणणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जयंतीनिमित्त पिंपरीतील मुख्य प्रशासकीय इमारत, भीमसृष्टी तसेच दापोडी येथील पुतळ्यांवर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर, सभापती अभिषेक बारणे आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या वतीने ११ ते १७ एप्रिलदरम्यान ‘सामाजिक समता सप्ताह’ आणि ‘विचार प्रबोधन पर्व’ आयोजित करण्यात आले आहे.
दरम्यान, एकता कर्मचारी संघटनेतर्फे भीमसृष्टी येथे हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करून आंबेडकरांना अनोखी मानवंदना देण्यात आली.















