- पिंपरी-चिंचवड महापालिकेची ‘ग्रीन सिटी’कडे वाटचाल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १५ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देण्यासाठी सामान्य करावर विविध सवलती जाहीर केल्या आहेत. या निर्णयामुळे नागरिकांना ‘ग्रीन’ जीवनशैली स्वीकारण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.
ऑनसाइट कंपोस्टिंग, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) आणि झिरो वेस्ट संकल्पना राबवणाऱ्या इमारतींना ३ ते १० टक्क्यांपर्यंत कर सवलत दिली जाणार आहे. यामुळे कचरा व्यवस्थापन आणि पाण्याच्या पुनर्वापराला गती मिळणार आहे.
उपआयुक्त सचिन पवार यांनी सांगितले की, या सवलतींचा उद्देश पर्यावरणपूरक उपाययोजनांना प्रोत्साहन देणे हा आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहर स्वच्छ व शाश्वत बनविण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे नमूद केले.
महापालिकेच्या या उपक्रमामुळे गृहनिर्माण संस्था व व्यावसायिक इमारतींमध्ये पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार आहे.















