न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १५ एप्रिल २०२६) :- राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील स्मारक व खराळवाडीतील मध्यवर्ती कार्यालयात अभिवादन करण्यात आले. शहराध्यक्ष योगेश बहल यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत समानता, न्याय व शिक्षणाचा संदेश पुढे नेण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी नगरसेवक ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी आंबेडकरांच्या संविधान निर्मिती व सामाजिक न्यायातील योगदानावर प्रकाश टाकला. सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास कार्याध्यक्ष फजल शेख, विजय लोखंडे, पंडीत गवळी, प्रकांश सोमवंशी, राजेंद्र जगताप, शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, योगिता बारणे, सचिन औटे, ज्ञानेश्वर कांबळे, राजेंद्रसिंग वालिया, अकबर मुल्ला, शक्रुल्ला पठाण, कुमार कांबळे, प्रशांत महाजन, रवींद्र ओव्हाळ, श्रीकांत कदम, संभाजी बारणे, बाळासाहेब पिल्लेवार, संगीता कोकणे, भाग्यश्री मस्के, नीलम कदम, देवी थोरात, राजू चांदणे, सुरेंद्र सिंग बाला, चंदू हलगी, समीर थोरात, महेंद्र तापकीर, अभिजीत आल्हाट, धनाजी तांबे, सुनिल अडागळे आदी उपस्थित होते.















