- पालकांना सतर्कतेचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १५ एप्रिल २०२६) :- महापालिकेच्या शिक्षण विभागाने इंग्रजी माध्यमाच्या अनधिकृत शाळांची यादी जाहीर करत पालकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. २०२६-२७ शैक्षणिक वर्षात या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.
ब्लोमिंग बईस (ताथवडे), माने इंग्लिश मीडियम स्कूल (काळेवाडी), लिटिल स्टार इंग्लिश मीडियम (चिंचवडेनगर), हेम्स इंटरनॅशनल स्कूल (वाकड), नर्चर इंटरनॅशनल स्कूल (काळजेवाडी, चर्होली), गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल (मोशी), माईंडवर्ल्ड इंटरनॅशनल स्कूल (काळजेवाडी, चर्होली) आणि कॅटलिस्ट इंटरनॅशनल स्कूल (चर्होली फाटा) या शाळांचा समावेश आहे.
या शाळांकडे आवश्यक मान्यता नसल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होऊ शकतो, अशी माहिती प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी दिली. संबंधित शाळांना पूर्वी नोटिसा देऊनही त्या सुरू असल्याने लवकरच कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले.











