- बाबासाहेबांच्या जयंतीदिनी भाटनगरला हादरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १५ एप्रिल २०२६) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पहाटेच पिंपरीतील भाटनगर परिसरात झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली. भाटनगर येथील बिल्डिंग क्रमांक ७ जवळ पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.
राज कजानिया (२४) व त्यांचा मित्र विश्वास शिंदे (२८) यांच्यावर अक्षय पांढरे व ऋतिक पांढरे यांनी लाकडी दांडे व लोखंडी रॉडने हल्ला करत गंभीर जखमी केले. पूर्वीच्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हल्ल्यानंतर आरोपींनी परिसरात दहशत निर्माण करत पळ काढला. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता व इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ऋतिक पांढरे याला अटक करण्यात आली आहे.
या घटनेमुळे भाटनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास सपोनि लोखंडे करत आहेत










