- त्यांच्या जागी कुलदीप जंगम यांची नियुक्ती..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि.१६ एप्रिल २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांना महापालिका सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या आदेशानुसार तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
नगरविकास विभागाच्या १६ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार अतिरिक्त आयुक्त पदांपैकी एक पद भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या १५ एप्रिल २०२६ च्या आदेशान्वये कुलदीप जंगम (भाप्रसे) यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीच्या अनुषंगाने विजयकुमार खोराटे यांना १६ एप्रिल २०२६ रोजी मध्यान्हपूर्व कार्यमुक्त करण्यात आले असून त्यांना नगरविकास विभाग, मंत्रालय मुंबई येथे रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.










