न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि.१६ एप्रिल २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सामाजिक समता सप्ताह व ‘विचार प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत स्पर्धा परीक्षा केंद्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला. क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात हा उपक्रम पार पडला.
महापौर रवि लांडगे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे ही महापालिकेची प्राथमिकता असल्याचे सांगितले. स्पर्धा परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, आत्मविश्वास व स्पर्धात्मक दृष्टिकोन देत असून भविष्यात अधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी दिनकर गायकवाड, प्रतीक वाघमोडे, कृष्णा लोखंडे, सुमित कानडे, तनिषा गेगंजे, रणजित दाभाडे, ज्योती पानमंद, पायल शेलार, पूजा तलारे, सनी पोळ व अक्षय काळडोके यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास धर्मपाल तंतरपाळे, अण्णा बोदडे, पंकज पाटील व प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.










