न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि.१६ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत असताना महापालिकेच्या यांत्रिकी विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असताना विभागातील काही फिटर कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक दुचाकी व चारचाकी वाहने धुतली जात असल्याचे समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे.
माहितीनुसार, यांत्रिकी विभागात गरजेपेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असून अनेकजण कामाविना बसत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, सेक्टर २४ येथील जलशुद्धीकरण व पाणीपुरवठा विभागात कर्मचारी वर्गाची कमतरता भासत असताना अतिरिक्त मनुष्यबळ यांत्रिकी विभागात का ठेवले आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणाची दखल स्थायी समितीने घेतली असून कार्यकारी अभियंता कैलास दिवेकर यांना सूचना देण्यात आल्याचे समजते. महापौरांनीही तक्रारी वाढत असल्याचे नमूद केले आहे. मात्र प्रशासनाची दिशाभूल होत असल्याचा आरोप होत असून निष्क्रिय कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर ताण आणत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आ










