न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि.१६ एप्रिल २०२६) :- शाहूनगर येथील श्री शाहू सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिव-शाहू-संभाजी उद्यानात आयोजित कार्यक्रमांना नागरिक व साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या वेळी “माय मराठी” कविसंमेलन, नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार तसेच निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री संगीता झिंजुरके होत्या. प्रा. तुकाराम पाटील, राज अहेरराव, विलास जेऊरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. बालकिशन मुत्याल यांनी प्रस्ताविक सादर केले.
नगरसेवक तुषारभाऊ हिंगे, अनुराधाताई गोरखे, सुप्रिया ताई चांदगुडे व कुशाग्र कदम यांचा सत्कार करण्यात आला. कविसंमेलनात मानसी चिटणीस, डॉ. पौर्णिमा कोल्हे, सीमा गांधी, सुहास घुमरे आदी कवींनी मराठी भाषेची महती मांडली. संग्राम उदय पाटील याने पोवाडा सादर केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र घावटे व गणेश सहाणे यांनी केले. सचिव राजाराम वंजारी यांनी आभार मानले. कार्यक्रमास मोठी उपस्थिती लाभली.










