न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.१६ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची ‘सारथी’ नागरिक सेवा प्रणाली अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि परिणामकारक करण्यासाठी महापौर रवि लांडगे यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत. नागरिकांच्या तक्रारींचे जलद व समाधानकारक निवारण व्हावे यासाठी ‘सारथी 2.0’ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापौरांनी स्पष्ट केले की, सध्याच्या प्रणालीत तक्रारींचे विलंबाने वर्गीकरण, ‘Resolved’ स्थितीतील विसंगती आणि डेटा विश्लेषणाचा अभाव यांसारख्या समस्या आहेत. त्या दूर करण्यासाठी तक्रारींचे स्वयंचलित वर्गीकरण, फील्ड पडताळणी, मूळ कारण विश्लेषण (RCA) आणि स्पष्ट सेवा मानके (SLA) लागू करण्यात येणार आहेत.
तसेच, AI आधारित तक्रार व्यवस्थापन, प्रेडिक्टिव अॅनालिटिक्स आणि चॅटबॉट सुविधा यांचा समावेश करून प्रणाली अधिक स्मार्ट करण्यात येणार आहे. ३० दिवसांत कृती आराखडा व ६० दिवसांत सुधारित रोडमॅप सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या उपक्रमामुळे नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि दर्जेदार सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.










