- महाराष्ट्रात संघटन बळकटीसाठी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती; युवकांना नेतृत्वाची संधी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि.२३ एप्रिल २०२६) :- आम आदमी पार्टी (AAP) महाराष्ट्र राज्याच्या वतीने युवक संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने ‘आप युवा आघाडी’च्या राज्य कार्यकारिणीतील नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत पत्र २१ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आले.
राज्यातील तरुणांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे आणि पक्षाची भूमिका जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्रिय व अनुभवी कार्यकर्त्यांना संधी देण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे :
मोईन इजाज मोकाशी – प्रदेश कार्याध्यक्ष
चेतन श्रीनिवास मच्चा – प्रदेश कार्याध्यक्ष
उमेश निवृत्ती मेटकर – प्रदेश कार्याध्यक्ष
प्रणित राजेंद्र डोंगरे – प्रदेश कार्याध्यक्ष
अमर दिलीप गांगुर्डे – प्रदेश कार्याध्यक्ष
ऋषिकेश पिराजी कानवटे – प्रदेश उपाध्यक्ष
प्रदीप गणपतराव थोरवे – प्रदेश उपाध्यक्ष
पुजा बाळकृष्ण गुरव – प्रदेश उपाध्यक्ष
शुभम ज्ञानेश्वर चव्हाण – प्रदेश सचिव
सुचना शैलेश गजभिये – प्रदेश सचिव
अनिकेत दत्तात्रय खताळ – प्रदेश संघटन मंत्री
विकास संभाजी पाटील – प्रदेश संघटन मंत्री
नीरज कुमार प्रजापति – प्रदेश समिती सदस्य
राहुल पंडित मुदनोर – प्रदेश समिती सदस्य
या नियुक्त्या पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी प्रकाश जरवाल, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील, प्रदेश सचिव डॉ. अभिजीत मोरे आणि युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष रविराज काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या आहेत.
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत राज्यातील युवकांचे व्यापक संघटन उभारून सामाजिक व राजकीय प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.











