- केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची प्रमुख उपस्थिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड | दि. ७ मे २०२६ :- पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचा १७ वा पदवीप्रदान समारंभ शनिवारी, ९ मे रोजी दुपारी ३.३० वाजता विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री तथा ईशान्य क्षेत्र विकास मंत्री Jyotiraditya M. Scindia हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. पी. डी. पाटील असतील. यावेळी डॉ. (ब्रिगे.) अमरजित सिंग आणि डॉ. ए. एल. काकराणी यांना वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
या समारंभात ३० गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन गौरविण्यात येणार असून, ९ विद्याशाखांतील एकूण १८,७२० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण डीपीयू संकेतस्थळावर पाहता येणार आहे.














