- सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक आणि नियमित देखभालीअभावी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड | दि. ७ मे २०२६ :- पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भूयारी मार्गांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरात एकूण अकरा ठिकाणी भूयारी मार्ग उभारण्यात आले असून, प्रवाशांचा सुरक्षित आणि विनाअपघात प्रवास व्हावा हा त्यामागील उद्देश होता. मात्र अनेक ठिकाणी नियमित साफसफाई होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
भूयारी मार्गांमध्ये अचानक दिवे जाणे, देखभालीचा अभाव, सुरक्षा रक्षक नसणे आणि सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने महिला, विद्यार्थिनी आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
काही भूयारी मार्ग निर्जन असल्याने महिलांसह पुरुषांनाही भीतीच्या वातावरणात प्रवास करावा लागतो. टवाळखोरांकडून होणारा त्रास रोखण्यासाठी तातडीने सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक आणि नियमित पाहणी व्यवस्था सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.














