न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०८ मे २०२६) :- भाजपा युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष दिनेश यादव यांनी त्यांच्या लाडक्या “सिंधु” गायीचा वाढदिवस भक्तिमय आणि भावनिक वातावरणात साजरा केला. या अनोख्या उपक्रमाची परिसरात मोठी चर्चा रंगली असून नागरिकांकडूनही कौतुक होत आहे.
“सिंधुर मोहीम” आयोजित करण्यात आलेल्या दिवसाच्या स्मरणार्थ गायीचे नाव “सिंधु” ठेवण्यात आले आहे. यादव परिवारासाठी सिंधु ही केवळ गाय नसून कुटुंबातील सदस्य बनली आहे. वाढदिवसानिमित्त सिंधुचे विधिवत पूजन, औक्षण करण्यात आले तसेच तिला पुष्पहार घालून गोड खाऊ भरवण्यात आला.
यावेळी दिनेश यादव म्हणाले, “गौमाता ही भारतीय संस्कृतीचे प्रतीक असून तिची सेवा करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.” गौसेवा आणि प्राण्यांप्रती माया जपणारा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.














