न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०८ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालयातून दीपक यू. डोंगरे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, व्ही. एन. गायकवाड व सौ. एम. ए. आवळे प्रथम वर्ग न्यायाधीश, पिंपरी-चिंचवड यांचा निरोप समारंभ पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अति. जिल्हा न्यायाधीश एस. एस. नायर मॅडम होत्या. व्यासपीठावर एस. एस. चव्हाण मॅडम, अल अमुदी, श्रीमती जी. जी. औटी, के. के. वाघमारे, श्रीमती ए. एल. आवटी, श्रीमती पी. डी. पाटील, श्रीमती एम. ए. आवळे, व्ही. एन. गायकवाड, श्रीमती टी. एस. महाडिक, पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, ॲड. सतिश गोरडे, ॲड. सुशील मंचरकर आदी उपस्थित होते.
दीपक यू. डोंगरे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचा सत्कार अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज यांच्या हस्ते भक्ती-शक्ती प्रतिमा, संत तुकाराम महाराजांची पगडी व उपरणे देऊन करण्यात आला. तसेच व्ही. एन. गायकवाड यांचा सत्कार माजी अध्यक्ष ॲड. किरण पवार व ॲड. सुनील कडूसकर यांच्या हस्ते करण्यात आला. सौ. एम. ए. आवळे प्रथम वर्ग न्यायाधीश, पिंपरी-चिंचवड यांचा सत्कार ॲड. संगीता परब, ॲड. कांता गोरडे व ॲड. सुजाता बीडकर यांनी केला.
यावेळी दीपक डोंगरे, ॲड. सुशील मंचरकर तसेच अति. जिल्हा न्यायाधीश संध्या एस. नायर यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे नियोजन ॲड. अनिल शिंदे, ॲड. अक्षय फुगे, ॲड. सोहेल शेख, ॲड. रवि मराठे, ॲड. शंकर घगाळे, ॲड. प्रशांत सस्ते, ॲड. भूषण पाटील व ॲड. सुशांत गोरडे यांनी केले. आभार प्रदर्शन उपाध्यक्ष ॲड. अनिल पवार यांनी केले तर सूत्रसंचालन ॲड. मंगेश खराबे यांनी केले.














