- भोसरीतील राज्यस्तरीय स्पर्धेत शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा गौरव…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०८ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरी येथील गावजत्रा मैदानावर आयोजित “महापौर चषक २०२६-२०२७” राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा सत्कार करत खेळाडूंशी संवाद साधला.
“महापौर चषकसारख्या स्पर्धांमुळे राज्यातील युवा खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळते. अशा स्पर्धांमधून शिस्त, नेतृत्व आणि संघभावना विकसित होते,” असे मंत्री पाटील म्हणाले. भारत २०३६ पर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद भूषवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, महापौर रवि लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात बॉक्सिंगपटू विजय यादव, सायकलपटू मीनाक्षी शिंदे, पॅरा जलतरणपटू वैष्णवी जगताप आणि कबड्डीपटू विराज लांडगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.














