- छत्रपती संभाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाची पिंपरी-चिंचवडमध्ये उत्साहात सुरुवात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ११ मे २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित छत्रपती संभाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाअंतर्गत सादर करण्यात आलेल्या ‘शिवरूद्र शंभुराजे’ या भव्य महानाट्याच्या पहिल्या प्रयोगाला शिवप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
चिंचवड येथील बर्ड व्हॅली परिसरात झालेल्या या कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंगांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.
२०० हून अधिक कलाकार, भव्य नेपथ्य, घोडे-उंट, प्रकाशयोजना आणि आतषबाजीमुळे प्रेक्षक भारावून गेले. उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महानाट्याचे पुढील प्रयोग ११ व १२ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहेत.














