न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ११ मे २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०२६’ मध्ये पुरुष गटात रत्नागिरीच्या वाघजाई संघाने तर महिला गटात पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने विजेतेपद पटकावले.
समारोप व पारितोषिक वितरण महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार महेश लांडगे, माजी मंत्री सचिन अहिर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडूंना बुलेट, चेतक गाडी, रोख पारितोषिके आणि चषक देऊन गौरविण्यात आले. राज्यभरातील नामांकित खेळाडू व क्रीडाप्रेमींनी स्पर्धेला मोठी उपस्थिती लावली.













