न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १२ मे २०२६) :- पिंपरी चिंचवड हे केवळ औद्योगिक शहर नसून क्रीडा क्षेत्रातही देशाला दिशा देणारे शहर बनत आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.
किंग मार्शल आर्ट्स संस्थेच्या खेळाडूंचा महापौर कार्यालयात गौरव करण्यात आला. उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे झालेल्या भारत-नेपाळ इंडियन इंटरग्रील चॅम्पियन स्पर्धेत थेरगावच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.
जयदेव म्हमाणे यांनी सुवर्णपदक पटकावत आतापर्यंत ११ सुवर्णपदके जिंकली आहेत. त्यांच्या यशाची दखल पंतप्रधान Narendra Modi यांनी घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले.














