- आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १२ मे २०२६) :- युनायटेड किंगडममधील महाराष्ट्र मंडळ, लंडन या मराठी बांधवांच्या सांस्कृतिक केंद्राच्या जागेसाठी महाराष्ट्र शासनाने ५ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध झाला. राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली.
या निधीमुळे लंडनमध्ये मराठी सण-उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम व भाषा वर्गांना अधिक चालना मिळणार असून मराठी संस्कृतीच्या जतनाला मोठे बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.














