न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १२ मे २०२६) :- पिंपरी चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांमधील झाडांच्या छाटणीसाठी महापालिकेकडून स्वतंत्र धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती शंकर जगताप यांनी दिली. यामुळे झाडांच्या ट्रिमिंगचा आर्थिक भार नागरिकांवर पडणार नाही. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत वाहतूक कोंडी, पर्यावरण संवर्धन, आरएमसी प्रदूषण नियंत्रण, नाले सफाई, सार्वजनिक शौचालये आणि कर्मचाऱ्यांच्या योजनांबाबतही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तसेच अर्बन स्ट्रीट अंतर्गत काही ठिकाणी फुटपाथची रुंदी कमी करून रस्ते रुंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.














