- ५ हजारांहून अधिक रिक्त पदांसाठी नामांकित कंपन्यांकडून थेट मुलाखती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १२ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड परिसरातील बेरोजगार युवक-युवतींसाठी १४ मे रोजी सांगवी येथे ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. शंकर जगताप यांनी ही माहिती दिली.
न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल, नवी सांगवी येथे सकाळी ९ वाजता मेळाव्यास सुरुवात होणार आहे.
आयटी, ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल व बँकिंग क्षेत्रातील नामांकित कंपन्या थेट मुलाखती घेणार आहेत. पाचवीपासून पदव्युत्तर, आयटीआय व डिप्लोमाधारक उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. या मेळाव्यात ५ हजारांपेक्षा अधिक रिक्त पदांवर भरती केली जाणार असून सहभागी उमेदवारांना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.














