- १६ खेळाडूंनी पटकावली १२ सुवर्ण व ४ रौप्य पदके…
- पिंपरी-चिंचवडच्या शिरपेचात मानाचा तुरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १२ मे २०२६) :- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, महाराष्ट्र स्पीडबॉल असोसिएशन, पुणे जिल्हा व पुणे शहर स्पीडबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय स्पीडबॉल क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६ या दिनांक १० ते ११ मे २०२६ दरम्यान विभागीय क्रीडा संकुल, बारामती येथे उत्साहात पार पडल्या.
स्पर्धांचे उद्घाटन सहाय्यक क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकाते व तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, लातूर, मुंबई, अमरावती, नाशिक आणि नागपूर विभागातील सुमारे २५० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
स्पर्धेचे आयोजन आणि पंचकार्याची जबाबदारी महाराष्ट्र स्पीडबॉल असोसिएशनचे महासचिव ज्ञानेश काळे, अशोक देवकर, रामचंद्र रणदिवे, पंचप्रमुख गणेश भोसले, ज्ञानेश्वर जाधव, तांत्रिक समिती प्रमुख गणेश म्हस्के, चंद्रकांत तोरणे व निरज इनामदार यांनी पार पाडली.
या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत १६ खेळाडूंच्या सहभागातून तब्बल १२ सुवर्ण व ४ रौप्य पदके पटकावली. त्यामुळे शाळेसह पिंपरी-चिंचवड शहराच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात भर पडली आहे.
पदक विजेते खेळाडू..
सुवर्ण पदक विजेते..
विदित शिंदे (८वी-C) — Boys Under-14 Super Solo
ओवी व्यवहारे (८वी-C) — Girls Under-17 Single
निशांत तेजम (८वी-D) — Boys Under-17 Super Solo
अंशिका सिंह, आरोही मोरे, सांक्रुती खोत, प्राची आचाळकर — Girls Under-17 Relay
पृथ्वीराज पवार (६वी-C) — Boys Under-19 Super Solo
वेदिका पाटोळे व पूर्वा मंधारे — Girls Under-19 Double
चिन्मय बारहाते व श्रावण काचले — Boys Under-19 Doubles
रौप्य पदक विजेते..
हर्ष कुलकर्णी, साई ठाणगे, ओम कोलते, पार्थ मंगुटे — Boys Under-19 Relay
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार अमित गोरखे, विश्वस्त विलास जेऊरकर, शाळा व्यवस्थापक डॉ. प्रिया गोरखे आणि शाळा संसाधन प्रमुख समीर जेऊरकर यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका मृदुला गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत क्रीडा विभागाचे विशेष कौतुक केले.
या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक निरज इनामदार, प्रीती काळे, आकांक्षा घुले तसेच क्रीडा विभाग प्रमुख विजय टेपुगडे यांचे मार्गदर्शन लाभले.














