न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १२ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवडमधील मासुळकर कॉलनी येथील कु. कबीर राहुल कांबळे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत देशात १२५ वी रँक मिळवत भारतीय वन सेवा (IFS) पदावर निवड मिळवली आहे. त्यांच्या या यशाबद्दल महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी महापौर वैशाली घोडेकर, नगरसदस्या सारिका मासूळकर तसेच कांबळे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर मिळविलेल्या या यशामुळे शहराचा गौरव वाढला असून, कबीर कांबळे हे शहरातील तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत, अशी भावना महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केली.














