न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १२ मे २०२६) :- छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम, राष्ट्रनिष्ठा आणि स्वराज्यासाठीचे बलिदान युवा पिढीपर्यंत जिवंत स्वरूपात पोहोचविणारे ‘शिवरूद्र शंभुराजे’ महानाट्य हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन आमदार अमित गोरखे यांनी केले. चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यानात सुरू असलेल्या महानाट्याच्या दुसऱ्या प्रयोगावेळी ते बोलत होते.
१० ते १४ मे दरम्यान आयोजित विचार प्रबोधन पर्वाअंतर्गत हे महानाट्य सादर होत असून, २०० हून अधिक कलाकारांचा सहभाग, भव्य रंगमंच आणि थरारक युद्धप्रसंगांमुळे नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
१४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सायंकाळी शिवशाहीर सुरेश सूर्यवंशी आसंगीकर यांचा शाहीरी कार्यक्रम तसेच नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान होणार आहे.














