न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १३ मे २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इमारतींमध्ये ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचा वापर करून वीज बचत, खर्च नियंत्रण आणि पर्यावरण संवर्धन साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ऊर्जा बचतीचे उपक्रम केवळ अहवालांपुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देण्याच्या सूचना दिल्या. बैठकीत ऊर्जा वापर विश्लेषण, निधी संरचना, आर्थिक व्यवहार्यता, प्री-फिजिबिलिटी स्टडी आणि व्यवसाय आराखड्यावर चर्चा झाली. महापालिकेच्या एसी यंत्रणा, वॉटर पंप व अन्य विद्युत उपकरणांमध्ये ऊर्जा बचतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्यात आला.
ए.डी.बी, ए.इ.इ.इ आणि सी.इ.इ.डब्ल्यू संस्थांचे प्रतिनिधी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.














