न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. १३ मे २०२६) :- रोजगार हमी योजनेतील कामांमध्ये होत असलेल्या दिरंगाईवर आमदार सुनील शेळके यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले. विधानभवन येथे झालेल्या रोजगार हमी योजना समितीच्या बैठकीत विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. अनेक मंजूर कामे अपूर्ण असल्याचे तसेच काही कामे रद्द झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर समितीने प्रशासनाला धारेवर धरले.
रखडलेली कामे तातडीने पूर्ण करून प्रत्येक कामाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. ग्रामीण भागातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रेशीम लागवड उद्योगाला चालना देण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. युवकांना प्राधान्याने अनुदान मिळावे, यासाठी स्वतंत्र योजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी आमदार शेळके यांनी केली.














