न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ मे २०२६) :- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा प्रतिष्ठित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ यंदा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना जाहीर करण्यात आला आहे.
ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे रविवार, दि. २४ मे रोजी सायंकाळी ५ वाजता निगडी येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृह येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत अविनाश धर्माधिकारी यांचे ‘सावरकर समजून घेताना’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. धर्मजागरण, गोरक्षा आणि सामाजिक ऐक्य यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती संयोजक राजन लोणकर यांनी दिली. कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.














